माझे तीर्थरूप दिवंगत श्री. प्रकाश जयराम किन्हीकर यांच्या १९९० च्या रोजमेळाच्या डायरीचे एक पान.
पेट्रोलः १३ रूपयांना १ लीटर + सिंगल आॅइल (लुना डबल प्लस होती घरी)
श्रीखंडः ३ पावकिलो २४ रूपयांना
२५ विड्याची पाने १ रूपयात. घरी पानाचे साग्रसंगीत तबक असायचेच. तंबाखू, चमन बहार सकट.
तरीही आम्हा तिघा भावंडांपैकी एकालाही त्यातल्या सुपारीच्या खांडाचीही चव घ्याविशी वाटली नाही मग व्यसन तर फार दूर. तीर्थरूप दादा १९९७ साली गेल्यानंतर मग घरी कधीही पानदान म्हणून सजले नाही. ती शान त्यांच्यासोबतच इतिहासजमा झाली.
शेंगदाणे तेल ३४ रूपये किलो.
दूध ५ रूपये ५ पैसे लीटर.
तीर्थरूप दादांनी बरेच वर्षे हा रोजमेळ लिहीला. मी पण कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला असताना आणि त्यानंतरही बरेच वर्षे हा रोजचा खर्च लिहून ठेवत असे. सगळ्या डायर्या अजूनही शाबूत आहेत.
कधीतरी उघडून वाचल्या की तत्कालीन सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसते.
जमाखर्च म्हणजे केवळ पैशांचाच आरसा असतो असे नाही तर नात्यांचे, समाजाचे आणि इतर असंख्य गोष्टींचे ते प्रतिबिंब असते. फक्त आपल्याकडे पैशांपलीकडे वाचन करता येणारी नजर मात्र हवी.
- जीवनाकडे जमा खर्चाच्या पलिकडे जाऊन कायम बघणारा, गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Very Nice..
ReplyDeleteThank you, Sir.
Delete