* ज्येष्ठा कनिष्ठा गौरींनी आगमनाआधी पाहिलेली तन, मन आणि धनाची परीक्षा. मर्यादित संसाधनांची उपलब्धता.
* आजच्या दिवशीचा नेमका मुहूर्त साधून स्वयंपाक व इतर सेवा पुरवणार्यांनी वाढवलेले अव्वाच्या सव्वा दर.
* "मारे 'शेफ, शेफ' म्हणून मिरवत असतोस ना, मग दाखव आता तुझी शेफगिरी" हा गौराई कडून आलेला आणि हृदयाला जाणवलेला संदेश.
* "चला, आता या परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊनच दाखवू" हे स्वीकारलेले आव्हान.
* सहधर्मचारिणीच्या साथीने पहाटे पासूनच अक्षरशः कंबर कसून (उत्तरीय कंबरेला बांधून) स्वयंपाकघरात केलेला प्रवेश.
* आपल्या आईला आज आपल्याकडूनच ही सेवा करून घ्यायची आहे या जाणीवेने आलेला अमाप उत्साह.
* पती पत्नींच्या सहा, साडेसहा तासांच्या मेहेनतीनंतर तयार झालेला प्रसाद.
* प्रसाद ग्रहण करणार्या अभ्यागतांनी त्यावर उत्तम अभिप्राय नोंदवल्यानंतर, डोळ्यांच्या कडांशी दडवलेले अश्रू.
।। सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा।।




No comments:
Post a Comment