Sunday, August 2, 2020

काही पडलेले वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय प्रश्न

"सकाळचे नऊ वाजल्यावर सुधाकरच्या सांगण्यावरून आलोकने शालेय चॅनेलचे बटन दाबले.पडद्यावर फळ्याचे चित्र आले आणि त्या फळ्यापुढे वर्गशिक्षक चालत चालत आले. त्यांच्यासमोर देखील एक मोठा टीव्हीचा पडदा होता. त्यांच्याजवळ असलेल्या कंप्युटरवर प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद होती. प्रत्येक विद्यार्थ्याचा एक नंबर होता. तो दाबून मास्तरांना कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या टी.व्ही. च्या पडद्यावर पाचारण करता येत होते. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचे अभ्यासाचे रेकाॅर्ड कंम्प्युटरकडून त्यांना मिळू शके. जर त्यांना एखाद्या विद्यार्थ्याशी संभाषण करावेसे वाटले तर तशी सोय शालेय टी. व्ही. चॅनेलवर होती."
मार्च १९८३ मधे प्रकाशित झालेल्या आणि आमच्या बालपणी अनंत पारायणे केलेल्या, प्रख्यात जागतिक शास्त्रज्ञ, महाराष्ट्रभूषण, जयंत नारळीकर लिखित, प्रेषित या विझान कादंबरीतली ही वाक्ये.


बालपणी तर हे सगळे विश्व अशक्यप्रायच आणि कल्पनातीत वाटे. किंबहुना गेल्या १५ वर्षांपूर्वीही ही कल्पना आवाक्याबाहेरची वाटत होती ना ? पण आज सर्वत्र ही कल्पना सगुण साकार होताना आपण बघतोय. विज्ञानाची ही स्तिमीत करणारी झेप पाहून एका संपूर्ण युगंतराचा साक्षीदार असल्याची भावना माझ्या वयाच्या अनेकांमधे आहे.
मला नेहेमी प्रश्न पडतो. ही शास्त्रज्ञ माणसे खरेच इतकी द्रष्टी होती की पुढल्या काही शतकातल्या विज्ञानाच्या प्रगतीचा आलेख आजच मांडू शकायची ?
की
यांनी वेळोवेळी केलेल्या (शास्त्र आधारित) कल्पनाविलासाचा धागा पकडून पुढल्या पिढीतल्या संशोधक शास्त्रज्ञांनी आपले संशोधन केले ?
की
दोन्ही ?
- शास्त्र आणि तर्कशास्त्राचा जिज्ञासू अभ्यासक प्रा. राम किन्हीकर

1 comment:

  1. इथे तत्कालीन उपलब्ध तंत्रज्ञान पुढे नेलंय. ऐंशीच्या दशकात संगणक, दूरदर्शक दोन्हीही होते. त्याचा उत्तम वापर करून कथा सुंदर गोवलीय. आता परत वाचीन. 'राजहंस'च्या नवीन 'समग्र' (८००/-. २०२०. प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस, अभयारण्य.) मध्ये आहे ही... मजा आली. धन्यवाद. -मिलिंद

    ReplyDelete