Showing posts with label पंचपाळे. Show all posts
Showing posts with label पंचपाळे. Show all posts

Wednesday, May 5, 2021

चटणाळे उर्फ़ पंचपाळे उर्फ़ चौपाळे : एक विस्मृतीत गेलेला मित्र.

 आज सकाळी सकाळी श्वशुरगृही , स्वयंपाकघरात चाललेल्या चर्चेकडे सहज लक्ष गेलं, आणि बालपणीचा आणखी एक हरवलेला, जुना मित्र भेटला.

"चटणाळं"



एकतर हल्ली पंक्तीच मुळात नामशेष झाल्यात. उरला ब्युफे नावाचा प्रकार
आणि त्यातही आता "रायते", "सॅलडस" यांचीच चलती आहे मग बिचार्या चटणाळ्याची गरज कुणाला लागेल बरे ?
- चटणीसारखा असलेला आणि मित्रांच्या जीवनाला लज्जत आणणारा एक चांगला मित्र, रामभाऊ.