"लालपरी" हे नामाभिधान आम्ही बसफ़ॅन्सनी संपूर्ण लाल रंगाच्या महाराष्ट्र एस. टी. ना दिलेले आहे.
25/12/2012: मुंबईवरून सांगोल्याला परत जाताना आम्ही एक्सप्रेसवे ने न जाता जुन्या हायवेने (राष्ट्रीय महामार्ग 4) ने जाण्याचे ठरविले. खोपोलीजवळ येताच वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गाडी वळवली आणि मंदीराच्या पार्किंगमध्ये ही गाडी पाहून थक्क झालो.
वरदविनायक गणपतीच्या दारी मालवण डेपोची ही नवी कोरी लालपरी उभी होती. शालेय सहलीसाठी आलेली. चाकांना कार्ससारख्या डिस्कस लावलेली.
तिचे फ़ोटो काढण्याचा मोह आवरलाच नाही.
MH - 14 / BT 3063
सिं. मालवण आगार (मालवण आगार, सिंधुदुर्ग विभाग)
म. का. दा. न. ले 387, 2012 - 13 एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे) ने 2012 - 13 या वर्षात बांधलेली 387 वी नवी लेलॅण्ड बस.
अशोक लेलॅण्ड चित्ता मॉडेल, भारत इमिशन स्टॅण्डर्डस 3 दर्जा
No comments:
Post a Comment