नागपूर शहर बस सेवा बरीच वर्षे महाराष्ट्र एस. टी. कडे होती. साधारण 2009 च्या आसपास ही सेवा एस. टी. ने नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केली. महानगरपालिकेने वंश निमय या संस्थेकडे ती सेवा चालवण्यासाठी दिली.
एस. टी. कडे असताना म्हणा किंवा वंश निमय कडे असताना सुरूवातीच्या काळात नागपुरात बस सेवेत टाटाच्याच गाड्या दिसायच्यात. वंश निमयने 2014 मध्ये पहिल्यांदा अंबाला येथील एच. एम. एम. कडून बांधल्या गेलेल्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस शहर बस सेवेसाठी घेण्याचा निर्णय घेतला. HR - 37 या टेंपररी पासिंगच्या बसेस 2014 मध्ये नागपूर आर टी ओ तून MH - 31 / CA 5XXX या पासिंग मध्ये नागपूरकरांच्या सेवेसाठी आल्यात.
नागपूर शहर बस वाहतूक एस. टी. कडे असतानाच्या आठवणींचा ब्लॉग इथे.
नागपूर शहर बस वाहतूक खाजगी संस्थांकडे गेल्यावर तिचे जे काही धिंडवडे निघालेत त्यावर लवकरच आणखी एक ब्लॉगपोस्ट लिहीण्याचा मनोदय आहे. सध्या नागपूर शहर बस सेवा म्हणजे "आंधळं (नागपूर महापालिका प्रशासन) दळतय आणि कुत्रं (खाजगी बससेवा ऑपरेटर्स) पीठ (नागरिकांच्या कराच्या पैशांचे) खातंय." अशी आहे. त्यावर एक सविस्तर पोस्ट लवकरच.
जाऊदे. आपले पहिले प्रेम बस आहे. अशा सुंदर सुंदर बसेसचे फ़ोटो टाकण्याचे काम आपण करूयात, झालं.
- स्वतःच्या तरूणपणातही एखादी सुंदर तरूणी दिसल्यावर कदाचित मान वळवून पाहणारा, न पाहणारा पण सुंदर बस दिसल्यावर मात्र बसस्थानकापर्यंत तिचा पाठलाग करणारा आणि तिच्याबाबत सगळी माहिती गोळा करणारा, बसप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment