Saturday, October 1, 2022

देवाचिये द्वारी - ८४

 


परमात्मा निर्गुण निराकार I परमात्मा अनंत अपार I

परमात्मा नित्य निरंतर I जैसा तैसा II

 

आत्मनिवेदनाचे लक्षण I आधी पाहावे मी कोण I

मग परमात्मा निर्गुण I तो वोळखावा II

 

देव भक्त दोनी येक I ज्यासी कळला विवेक I

साधुजनी मोक्षदायेक I तोचि जाणावा II

 

आत्म्याचे नित्य निरंतर स्वरूप जाणून आत्मा आणि परमात्मा यात फ़रक नाही हे ज्याला कळले त्याला मोक्षप्राप्ती झाली असे श्रीसमर्थ आग्रहाचे प्रतिपादन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध षष्ठी शके १९४४ , दिनांक ०१/१०/२०२२)


No comments:

Post a Comment