Thursday, October 20, 2022

देवाचिये द्वारी - १०३

 


जे आपणांस नव्हे ठावे I तें जाणतयांस पुसावे I

मनोवेगें तनें फ़िरावें I हें तों घडेना II

 

जे चर्मदृष्टीस नव्हे ठावें I तें ज्ञानदृष्टीनें पाहावें I

ब्रह्मांड विवरोन राहावें I समाधाने II

 

वाच्यांश वाचेने बोलावा I न बोलता लक्ष्यांश जाणावा I

निर्गुण अनुभवास आणावा I गुणाचेनयोगें II

 

या जगात वावरताना संसारी मनुष्याने कसे वागावे याचे विवेचन श्रीसमर्थांनी ग्रंथराज श्रीमददासबोधात ठायीठायी केलेले आढळते. आज चारशे वर्षांनंतरही यातली शिकवण आपल्या आचरणात आणण्यासारखी आहे हे या ग्रंथाचे कालातीतत्व आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण दशमी शके १९४४ , दिनांक २०/१०/२०२२)


No comments:

Post a Comment