Wednesday, October 5, 2022

देवाचिये द्वारी - ८८

 


विद्या नाही बुद्धी नाही I विवेक नाही साक्षेप नाही I

कुशलता नाही व्याप नाही I म्हणौन प्राणी करंटा II

 

इतुकेही जेथे वसे I तेथे वैभवास उणे नसे I

वैभव सांडता अपैसे I पाठी लागें II

 

जैसी विद्या तैसी हाव I जैसा व्याप तैसे वैभव I

तोलासारिखा हावभाव I लोक करिती II

 

याकारणे उत्तम गुण I तेंचि भाग्याचे लक्षण I

लक्षणेविण अवलक्षण I सहजचि जालें II

 

 

परमार्थात वागताना मनुष्यमात्रांनी ब्रम्ह, माया इत्यादि गोष्टींचा विवेक ठेवावा असे श्रीसमर्थांना वाटते आणि त्याहूनही जास्त विवेक, सावधानता प्रपंच करताना मनुष्यांनी ठेवायला हवी असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे. प्रपंचात वावरताना विद्या, बुद्धी, विवेक, साक्षेप, कुशलता, व्याप आदि गोष्टी मनुष्यमात्रांनी ध्यानात ठेवल्यात तर त्यांचे इहलोकीचे जीवन सुखकर आणि यशस्वी होईल.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध दशमी, विजयादशमी, दसरा शके १९४४ , दिनांक ०५/१०/२०२२)


No comments:

Post a Comment