Wednesday, October 19, 2022

देवाचिये द्वारी - १०२

 


येक भरे येक रितें I रितें मागुते भरतें I

भरतेंही रितें होतें I काळांतरी II

 

ऐसी हे सृष्टीची चाली I संपत्ती दुपारची साऊली I

वयेसा तरी निघोन गेली I हळु हळु II

 

बाळ तारूण्य आपलें I वृद्ध्याप्य प्रचितीस आले I

ऐसें जाणोन सार्थक केलें I पाहिजे कोणी येकें II

 

 

या अनित्य सृष्टीचे स्वरूप कायम बदलत असते. आपले शरीर, आपली संपत्ती हे सगळे दुपारच्या सावलीप्रमाणे अनित्य आणि नाशिवंत आहे. हे जाणून चिरंतन वस्तूकडे (भगवंताकडे) लक्ष लावून आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घावे असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक १९/१०/२०२२)


No comments:

Post a Comment