Monday, October 10, 2022

देवाचिये द्वारी - ९३

 


बहुता जन्मांचा सेवट I नरदेह सापडे अवचट I

येथे वर्तावे चोखट I नीती न्यायें II


प्रपंच करावा नेमक I पाहावा परमार्थ विवेक I

जेणेकरिता उभय लोक I संतुष्ट होती II


तरी आता ऐसे न करावे I बहुत विवेके वर्तावे I

इहलोक परत्र साधावे I दोहीकडे II


अनेक जन्मांनंतर प्राप्त होणारा हा नरदेह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्या नरदेहाचा विशेषाधिकार जो विवेक तो वापरून मनुष्यप्राण्यांनी आपापल्या जीवनाचे इहलोकी आणि परलोकीही सार्थक करून घ्यावे अशी श्रीसमर्थांची कळकळ आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण प्रतिपदा शके १९४४ , दिनांक १०/१०/२०२२)

No comments:

Post a Comment