Tuesday, October 18, 2022

देवाचिये द्वारी - १०१

 


मुळी उदक निवळ असते I नाना वल्लींमधें जातें I

संगदोषें तैसें होतें I आंब्ल तिक्षण कडवट II

 

आत्मा आत्मपणें असतो I देहसंगे विकारतो I

साभिमाने भरी भरतो I भलतिकडे II

 

पुण्यवंता सत्संगती I पापिष्टां असत्संगती I

गति आणि अवगती I संगतीयोगें II

 

 

मूळ निर्मळ, निःसंग असलेले पाणी जसे इतर पदार्थांच्या संगतीत आले की त्या त्या पदार्थांचे गुणधर्म आपल्यात सामावून घेते आणि पाण्याचे स्वरूप तसेच बनत जाते. तसा निर्मळ, निःसंग आत्मा ज्या देहाच्या संगतीत येतो त्या देहाचे गुणधर्म त्याला चिकटतात. म्हणून आपली उन्नती करून घ्यायची असेल तर कायम सत्संगतीच धरावी असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण अष्टमी / कराष्टमी शके १९४४ , दिनांक १८/१०/२०२२)


No comments:

Post a Comment