Sunday, October 16, 2022

देवाचिये द्वारी - ९९

 


थोडे बहुत समजले I पोटापुरती विद्या सिकले I

प्राणी उगाच गर्वे गेले I मी ज्ञाता म्हणोनी II

 

धन्य परमेश्वराची करणी I अनुमानेना अंतःकरणी I

उगीच अहंता पापिणी I वेढा लावी II

 

अहंता सांडून विवरणें I कित्येक देवाचे करणें I

पाहाता मनुष्याचे जिणें I थोडे आहे II

 

मनुष्याच्या या छोट्याचा आयुष्यात मनुष्यमात्राला थोडे जरी ज्ञान झाले तरी त्याचा त्यांना गर्व होतो. परमेश्वराच्या अगाध करणीसमोर आपले कर्तुत्व अगदी थिटे आहे याचा मनुष्यमात्रांना विसर पडतो आणि अहंकाराने तो वेढल्या जातो. साधकांनी असे वागू नये असा श्रीसमर्थांचा कळकळीचा उपदेश आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण षष्ठी / सप्तमी शके १९४४ , दिनांक १६/१०/२०२२)


No comments:

Post a Comment