Tuesday, October 4, 2022

देवाचिये द्वारी - ८७

 


ऐसे जे संचले सर्वदा I परी ते आकळेना कदा I

अभेदामाजी वाढवी भेदा I ते हे अहंता II

 

स्वये मीच आहे ब्रह्म I ऐसा अहंतेचा भ्रम I

ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म I पाहातां दिसे II

 

कल्पना आकळी हेत I वस्तू कल्पनातीत I

म्हणौन नाकळे अंत I अनंताचा II

 

सर्वत्र व्यापून असलेले ब्रह्म आणि त्याची निर्मिती असलेले आपण सगळे मनुष्यगण. आपण ब्रह्मरूप आहेत हे जाणणे म्हणजे ज्ञान पण आपणच ब्रह्म आहोत हे मानणे म्हणजे अहंता. त्या अनंताचा अंत कळला असे मानणे म्हणजेच अहंता असे श्रीसमर्थांचे प्रतिपादन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध नवमी शके १९४४ , दिनांक ०४/१०/२०२२)


No comments:

Post a Comment