ही पोस्ट पुन्हा वाचनात आली
आणि काॅमेंटसमध्ये उत्तरे देताना अधिक आठवणींना उजाळा मिळाला.
१९८० च्या दशकात चंद्रपूर,
यवतमाळ, नागपूर वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला विभागाच्या सुपर बसेसना मधे पांढरा पट्टा
असायचा. (पिवळ्याऐवजी नाही, लाल रंगाच्या मधोमध पांढरा.) त्याला काळी boarder असे.
त्या पांढर्या पट्ट्यावरच गाडीच्या डाव्या बाजूने मधोमध "अती जलद" आणि उजव्या
बाजूने मधोमध "Super Express" असे शैलीदार अक्षरात लिहीले असायचे.
"अती" आणि
"जलद" या शब्दांच्या मधोमध एस. टी. चा लोगो असायचा. तसाच लोगो
"Super" आणि "Express" मधे असायचा.
१९९० - २००० च्या दशकात पांढर्या
पट्ट्यावर खालीलप्रमाणे लिहायला सुरूवात झाली.
चंद्रपूर डेपो: Black Gold Express (कोळसा खाणी चंद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने)
वरोरा आगार: Anandvan Express
(बाबा आमटेंच्या आनंदवन प्रकल्पामुळे)
चिमूर आगार : Sangram
Express (१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील चिमूरवासियांच्या योगदानामुळे)
ब्रम्हपुरी आगार : White
Glory Express (ब्रम्हपुरी तालुका उत्तम प्रतीचे धान पिकविण्यासाठी प्रसिध्द आहे म्हणून)
अहेरी आगार : Silver Wood
Express. (अहेरी तालुक्यातले सागवानी लाकूड चांदीप्रमाणे मौल्यवान आहे म्हणून)
राजुरा आगार : White Grey
Express (राजुरा तालुक्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने आहेत म्हणून. सिमेंट ग्रे रंगाचे
किंवा पांढर्या रंगाचे म्हणून)
गडचिरोली आगार : Green
Wood Express (हा तालुका घनदाट जंगलांसाठी प्रसिध्द आहे म्हणून)
चंद्रपूर ते नागपूर प्रवासात
ताडाळीचे, ब्राम्हणीचे, बुटीबोरीचे आणि खापरीचे अशी ४ रेल्वे फाटके लागायची. ४ ही रेल्वे
फाटके उघडी आहेत असे क्वचितच व्हायचे. एकेका फाटकात रेल्वेसाठी वाट बघून, मग दोन्हीही
बाजूंने जमलेल्या एस. टी. ट्रक्सच्या जंजाळातून मार्ग काढीत आपला वेग गाठण्यापूर्वी
प्रत्येक बसचा किमान १५ मिनीटे तरी खोळंबा व्हायचा. अशावेळी त्या ड्रायव्हर काकांचे
कौशल्य पणाला लागायचे. तरीही सुपर बसेस तीन ते सव्वातीन तासात तर जलद बसेस साडेतीन
ते पावणेचार तासात हे १५३ किमी चे अंतर कापायच्यात. बसला ६५ किमी प्रतितासाचे स्पीडलाॅक
असताना.
जलद बसेस वरोर्याला रेल्वे
फाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्थानकावर जात व पुन्हा महामार्गावर येत असत. म्हणजे
सुपर बसेसना ४ रेल्वे फाटकांचा सामना करावा लागे तर जलद बसेसना ६ वेळा.
शिवाय जलद बसेस भद्रावती गावात
असलेल्या बसस्थानकापर्यंत जाऊन परत महामार्गावर येत असत. त्यामुळे तो सुध्दा जादा वेळ.
५.३० च्या चंद्रपूर जलद नागपूर
सारखीच ९.३० ची चंद्रपूर जलद तुमसर ही तुमसर डेपोची लेकुरवाळी बस होती.
काळ्या मार्गफलकावर पांढरी
अक्षरे असणारी चंद्रपूर - नागपूर साधारण बस मात्र एकच होती. ती बस मूल - नागभीड - उमरेड
या लांबच्या मार्गाने (१८० किमी) येत असे. सर्व थांब्यांवर थांबून जवळपास ५ तासात हा
प्रवास पूर्ण करीत असे.
- चंद्रपूर - नागपूर - नागपूर
प्रवासा्ला स्वतःच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनविलेला, बसफ़ॅन, राम.
No comments:
Post a Comment