Showing posts with label बनगरवाडी. Show all posts
Showing posts with label बनगरवाडी. Show all posts

Thursday, July 9, 2020

काकुबाच पण बनगरवाडीतला नव्हं.


दिवसभर प्रचंड डोके दुखत असल्यामुळे संध्याकाळी आपण बाम वगैरे चोळून बायकोची ओढणी गुंडाळून घेतो.
आपला "अवतार" बघितल्यावर कन्यारत्नाची काॅमेंट येते, "बाबा, तू आता बनगरवाडीतला 'काकूबा ' दिसतोय."
तिच्या वाचनाचे, विनोदबुध्दीचे कौतुक करावे, की सकाळपासूनच्या डोकेदुखीला वैतागावे ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना अस्मादिक.
एका परीने ते पण बरोबरच आहे म्हणा. त्या काकुबाला म्हणे त्याची सगळी मेंढरे ओळखता यायची. या काकुबालाही १९९५ पासून त्याने हाकलेली सगळी मेंढरे (पक्षीः विद्यार्थी) अगदी लख्ख आठवतात आणि ओळखूही येतात.
- आपले सगळे विद्यार्थी ओळखणारा प्रा. काकुबा.