आमचे बालपण इतवारीतल्या पोथी गल्लीत गेले.
शाळाः सी.पी.ॲण्ड बेरार, महाल.
रोजचा शाळेचा प्रवास चितार ओळीतूनच व्हायचा. त्या काळी बसने फक्त बाहेरगावी किंवा शहरात लांबच्या ठिकाणी (अभ्यंकर नगर, जयप्रकाश नगर वगैरे ठिकाणे शहराबाहेर गणली जायचीत.) जाता यायच हो. "स्कूल बस" हे लाड नव्हते हो. घराजवळ एक दीड किमी अंतरावर शाळा असली की कशाला बस ? आपली ११ नंबरची "विनोबा ट्रॅव्हल्स"च खरी आणि बरी.
आज बर्याच वर्षांनी गणपतीच्या मूर्तीचे advanced booking करायला चितार ओळीत गेलो. बालपण पुन्हा जगलो. एक पिढी पूर्ण बदलली. मेट्रो अगदी जवळून चाललीय पण चितार ओळ अजूनही बदलली नाही हे बघून खूप छान वाटल. सोबत असलेल्या कन्यारत्नाला माझ्या बालपणात घेऊन जाताना टिपलेली क्षणचित्रे. बालपणी कॅमेरा ही अतीव चैनीची गोष्ट होती. असता तर त्याकाळची क्षणचित्रे आणि आजच्या क्षणचित्रांमध्ये कणभरही फरक नसल्याच दाखवून देता आल असत.







No comments:
Post a Comment