आज काय तो जागतिक मैत्री दिवस का काय आहे म्हणे. गेल्या 15 वर्षांमध्ये याचं प्रस्थ वाढलय हे खरय़.
पूर्वी काय आणि आत्ता काय. मैत्री म्हणजे काय ? याची व्याख्या करणे कुणालाही जमले नाही. पुलंच्याच म्हणण्यानुसार "कुठल्या माणसाशी आपले ऋणानुबंध किती आणि कसे जुळावेत याला काही नियम नाही. काही माणसे वर्षानुवर्षे आपल्या संपर्कात असतात पण शिष्टाचाराची घडी मोडण्याइतकेही आपले संबंध त्यांच्याशी जुळत नाहीत. याउलट काही माणसे पहिल्या भेटीतच जन्मोजन्मांतरीची ओळख असल्यासारखी मनात बसून राहतात."
तसेच मैत्रीचे आहे. मैत्री ही नात्यांपलिकडे जाऊन जपली जाते. बहुतांशी वेळा नात्यांपेक्षा जास्त घट्ट जपली जाते. मैत्री कुणाशी व्हावी याचे नियम नाहीत त्यामुळे मैत्री ही नातेसंबंधांमध्येही होऊन जाते. पण मैत्रीचा विरह हा मैत्रीच्या मृत्यूपेक्षाही जास्त दुःखदायक, दाहक असतो.
फ़ार वर्षांपूर्वी कराड रेल्वे स्टेशनवर मैत्रीचे पाहिलेले एक दृश्य आणि त्यानुषंगाने माझ्या मनात स्फ़ुरलेल्या या ओळींचे पुनः सादरीकरण या लेखातून झालेले आहे. तो लेख पुन्हा आपल्या अवलोकनार्थ.
No comments:
Post a Comment