Showing posts with label DTC buses. Show all posts
Showing posts with label DTC buses. Show all posts

Saturday, January 13, 2024

DTC's Air Conditioned, Rear Engine, Semi Low Floor Bus

 




DTC's TATA Marcopolo, Rear Engine Air Conditioned , Semi Low Floor Bus, City Bus.

New Delhi Railway Station.

09/05/2011

#tatabus

#marcopolo

#semilowfloor

#citybus

#dtc

#newdelhi

#rearenginebus

Friday, January 12, 2024

डी टी सी, शहर बस सेवा, नागपूर शहर बस, खाजगी वाहतूक इत्यादि इत्यादि...



या प्रकाशचित्रात दिसते आहे ती आहे दिल्ली ट्रान्सपोर्ट कंपनीची नवी दिल्लीतली शहर बस. टाटा मार्कोपोलो मॉडेलची, मागे एंजिन असलेली, सेमी लो फ़्लोर शहर बस. नवी दिल्लीतल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या बसेस डीटीसीच्या सेवेत आल्यात. नवनव्या, चकचकीत, दिव्यांगांसाठी चढ उतार करण्यासाठी विशेष सोय असलेल्या. शहर बस सेवेच्या बसेस विशेष बांधून घ्यावा लागतात ही कल्पना साधारण 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या एस. टी. त आली. त्यापूर्वी आपली एस. टी. आपल्या बाहेरगावच्या बसताफ़्यातल्या बसेसचेच रूपांतर समोरून दुस-या रांगेतली डावीकडली एक आसनांची रांग काढत पुढच्या एका खिडकीचे रूपांतर दारात करून तिचे रूपांतर शहर बस सेवेच्या बसमध्ये करायची. 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात नागपूर शहर बस सेवेत "मधोमध मोठे दार असलेली बस" (सध्याच्या बी आर टी सेवेतल्या बसेसना असतात तितके रूंद दार पण एकच दार बसच्या मधोमध. मागे दुसरे दार नाही.) आल्याचे आठवते. पण त्या बसने प्रवाशांचे खूप अपघात होतात अशी खरीखोटी ओरड सुरू झाली आणि त्या बसेस फ़ारशा सेवेत दिसू शकल्या नाहीत.

आम्ही सोलापूर, पुणे, मुंबई इथे गेलोत की तिथल्या तिथल्या महापालिकांच्या सेवेत असलेल्या विशेष रूपाने बांधून घेतलेल्या शहर बस सेवेच्या बसेस बघायचोत आणि त्यांच्या प्रेमात पडायचोत. नागपूर शहर बस सेवेत 1983 -84 च्या आसपास ड्रायव्हर केबीनमधून उतरण्यासाठी एक आणि मागच्या बाजूला प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी एक अशी दोन दारे असलेल्या बसेसचा ताफ़ा आल्याचे आणि त्यातून भरपूर प्रवास घडल्याचे स्मरते. MTD 9584, MTD 9585 असे त्या बसेसचे नंबर्सदेखील स्मरतात. 

त्यानंतर 1992-1993 मध्ये अशा ड्रायव्हर केबिनमधून दार असलेल्या विशेष बसेस पुन्हा एस. टी. ने सेवेत आणल्यात. यावेळी या बसेस रूबी कोच, मुंबई, ऑटे बॉडी पुणे आणि इरॉस नागपूर अशा खाजगी कंपन्यांनी बांधलेल्या होत्या. MH - 12 / F 3375, MH - 12 / F 3403 अशा काही बसेस नागपुरात आलेल्या आठवतात. वर्षभरातच एस. टी. च्या स्वतःच्या कार्यशाळांनी बांधलेल्या तशाच धर्तीच्या बसेस सेवेत आणल्यात. MH - 12 / F 49XX सिरीजमधल्या या बसेस ब-याच काळ शहर बस सेवेत धावत होत्या. 

नागपूरची शहर बस सेवा 2008 -09 च्या आसपास खाजगी कडे गेली. तेव्हाही नवीन बसेसचा छान ताफ़ा या खाजगी ऑपरेटर्सकडे महापालिकेने दिला होता. पण "गा. गु. च. का." या म्हणीला जागून या गाढवांनी त्या बसेसचे थोड्याच अवधीत मातेरे केले. त्या बसेस घेतल्यापासून कधी धुतल्या तरी गेल्यात की नाही अशी त्यांची आज अवस्था आहे. या खाजगी ऑपरेटर्सकडे ना धड डेपोची जागा आहे, ना धड महापलिकेकडून डेपोसाठी मिळालेल्या जागेवर छान छत वगैरे बांधून बसेसचा मेण्टेनन्स करण्याची इच्छा आहे. ना तसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे आणि मुख्य म्हणजे नागपूरकरांना बससेवा देण्याची इच्छाशक्तीच यांच्यात नाही. त्यामुळे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था नागपूर शहर बस सेवेची सध्या आहे.

विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाची V. R. S. T. C. अशा खाजगी ऑपरेटर्सकडे गेली तर काय ? या भितीनेच विदर्भ वेगळा नको असे वाटायला लागते. कारण जुन्या मध्य प्रदेशातली "लंदफ़ंद सर्व्हिस" पुन्हा V. R. S. T. C. च्या रूपाने अवतरेल अशी सार्थ भिती माझ्यासारख्या सगळ्या बसप्रेमींना वाटते. आपल्या एस. टी. त अजूनही सुधारणेला भरपूर वाव असला तरी अशा खाजगी बस सेवेपेक्षा आपली एस. टी. बरीच चांगली आहे.


- दिल्लीपासून गल्लीपर्यंत बस दिसली की आपले नागपूरच आठवणारा, आणि कुठलाही विषय कुठेही नेऊन ठेवणारा, अस्सल पाल्हाळ, गोष्टीवेल्हाळ नागपूरकर प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, January 7, 2024

DTC Old bus in Service.

2011 - 2012 मध्ये डीटीसी या एकेकाळी कुख्यात असलेल्या शहर बस सेवेत फ़ार बदल घडून येत होते. नवनव्या वातानुकुलीत, बिगर वातानुकुलीत, लो फ़्लोअर बसेसची भर त्यात पडत होती. जुन्या बसेस हळुहळु सेवेतून बाद होत होत्या.

अशाच एका जुन्या बसचे करोलबागमधून टिपलेले प्रकाशचित्र.


2011 - 2012 was the transition period for the Delhi Transport Company's city bus fleet. Older buses were still in service but newer and newer AC and Non AC TATA Marcopolo Low Floor buses were getting introduced and were competing with the old buses.
Captured in Karol Bagh.
08/05/2011
TATA

Saturday, July 14, 2012

कृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत


कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली

दि. ०८/०५/२०११ 







ही चित्रे  कुठेतरी पाहिल्यासारखी वाटतायत  ना ? आमच्यापैकी बहुतेकांची हीच अवस्था झाली होती. अहो, आपल्या खिशातली ५०० ची नोट काढून पहा, मग उलगडा होइल.


The famous कुतूब मिनार.



विजय स्तंभ.


कुतूब मिनारावरची अप्रतिम कलाकुसर.


OMG ! पुन्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर की काय ?


केवळ अप्रतिम !


बहाई धर्माचे प्रार्थनास्थळ.  आत गेल्यावर खरोखर शांत शांत वाटतं.

दि. ९/५/२०११



नवी दिल्ली ची वाहतूक व्यवस्था अधिकच खुलवणा-या या सुंद-या.



आणि या कुविख्यात डी. टी. सी. बसेस. जुन्या झाल्यात. हळूहळू दिल्लीतून हद्दपार होत आहेत.


इंडिया गेट वरील हा शिलालेख. पहिल्या महायुध्दात ब्रिटीशांसाठी लढलेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ उभारलेले हे स्मारक.

दिल्लीच्या तापट गर्मी पासून वाचण्यासाठी सर्वांनी इंडिया गेटला खरेदी केलेल्या टोप्या. 



आणि मजेसाठी सर्वांनी दुपारी केलेली दिल्ली मेट्रो ची सफ़र. सुरूवातीच्या स्थानकावरून उगाचच शेवटच्या स्थानकापर्यंत गेलो आणि परतलो.

संध्याकाळी अक्षरधामला गेलो. जीवनात काहीतरी भव्यदिव्य पाहिल्याचं समाधान लाभलं. दिल्लीला भेट देणा-याने बघायलाच हवा असे हे अक्षरधाम. वर्णनाला शब्द अपुरे. (फ़ोटो वगैरे अजिबातच काढू देत नाहीत.) पण अधिक माहितीसाठी इथे भेट द्या.