प्रगतीसाठी नेहेमीच बेरीज करून उपयोग नाही. कधीकधी प्रगतीसाठी वजाबाकी ही आवश्यक असते.
Confused ?
नेहमी सकारात्मक असणारा हा माणूस अचानक नकारात्मक का लिहीतोय ?
तस काहीच नाहीये. साध उदाहरण घेऊयात.
१०० + (-४०) = ६०
बेरजेने १०० ची किंमत घटली ?
आता,
१०० - (-४०) = १४०.
वजाबाकीने १०० ची किंमत वाढली ?
तसच
आपल्या जीवनात ज्या व्यक्ती (कारण, अकारण) नकारात्मकता आणतात (Negative
persons) त्यांची जीवनातून वजाबाकी केली तर जीवनाचे मूल्य वाढेल. नाही का ?
—
"Mathematics involved in interpersonal relations with special reference
to self experiences in life" या K. P. Ramanujan या गणितज्ञाच्या (म्हणजे
अस्मादिकच) प्रसिध्द (फारसा कुणाला माहिती नाहीये तो) शोधप्रबंधातील एक
प्रमेय.