निराकार म्हणिजे आकार नाही
I निराधार म्हणिजे आ्धार नाही I
निर्विकल्प म्हणिजे कल्पना
नाही I परब्रह्मासी II
निरंजन म्हणिजे जनचि नाही
I निरंतर म्हणिजे अंतर नाही I
निर्गुण म्हणिजे गुणचि नाही
I परब्रह्मासी II
अरूप म्हणिजे रूपचि नाही I
अलक्ष म्हणिजे लक्षत नाही I
अनंत म्हणिजे अंतचि नाही I
परब्रह्मासी II
श्रीसमर्थ आपल्याला परब्रह्माचे
वर्णन करून सांगताना त्याच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन करून सांगताहेत. परब्रह्म हे
किती गुणातीत, कल्पनातीत आहे आणि तरीही ते कसे सर्वव्यापक आहे याचे नेमके वर्णन श्रीसमर्थ
करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध अष्टमी शके १९४४
, दिनांक ०३/१०/२०२२)
No comments:
Post a Comment