म्हणोनि सत्यचि बोलिले I कर्त्यास
पाहिजे वोळखिले I
मायोद्भवाचे शोधिले I पाहिजे
मूळ II
परमेश्वरास वोळखिले I आपण कोणसें
कळले I
आत्मनिवेदन जाले I म्हणिजे
बरे II
येथे अनुमान राहिला I तरी परमार्थ
केला तो वाया गेला I
प्राणी संशई बुडाला I प्रचितीविण
II
परमार्थात सर्व गोष्टींच्या
प्रचितीचा आग्रह साधकांनी करायला हवा. तिथे अनुमानाने कार्य केले तर त्यातून पुढे उपासना
मार्गात संशय उत्पन्न होईल आणि साधकाचा लाभ होणार नाही असे श्रीसमर्थ आपल्याला बजावताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन पौर्णिमा, कोजागरी
पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा शके १९४४ , दिनांक ०९/१०/२०२२)
No comments:
Post a Comment