Saturday, October 22, 2022

देवाचिये द्वारी - १०५

 


शुध सोने पाहोन घ्यावे I कसी लावून तावावे I

श्रवणमनने जाणावे I प्रत्ययासी II

 

जे प्रचितीस आले खरें I तेंचि घ्यावे अत्यादरें I

अनुभवेवीण जे उत्तरें I ते फ़लकटें जाणावी II

 

पिंडी नित्यानित्य विवेक I ब्रह्मांडी सारासार अनेक I

सकळ शोधूनिया येंक I सार घ्यावें II

 

 

साधकांनी अध्यात्मात काय किंवा व्यवहारात काय, प्रत्यय आल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू नये. त्यातही नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार करून वागावे अशे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण द्वादशी / त्रयोदशी, वसुबारस / धनत्रयोदशी शके १९४४ , दिनांक २२/१०/२०२२)


No comments:

Post a Comment