Thursday, October 6, 2022

देवाचिये द्वारी - ८९

 


जाणिजे देव निर्गुण I जाणिजे मी तो कोण I

जाणिजे अनन्यलक्षण I म्हणिजे मुक्त II

 

जितुके जाणोंन सांडिले I तितुके दृश्य वोलांडिले I

जाणत्यास जाणता तुटले I मूळ मीपणाचे II

 

जाणता समर्थांचे अंतर I प्रसंगे वर्ते तदनंतर I

भाग्य वैभव अपार I तेणेचि पावे II

 

सर्वसामान्य संसारी मनुष्याला या संसारचक्रातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर त्या जाणत्या पुरूषाला, परमात्म्याला त्याने जाणून घ्यायला हवे. त्या जाणत्याला जाणून घेऊन आणि त्याहूनही त्याच्यासारखा दुसरा कुणीही नाही, तो अनन्य आहे याची जाणीवच सर्वसामान्य मनुष्याला भाग्यपथावर नेईल.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध एकादशी, पाशांकुशा एकादशी शके १९४४ , दिनांक ०६/१०/२०२२)


No comments:

Post a Comment