Saturday, October 15, 2022

देवाचिये द्वारी - ९८

 


दिसेल ते नासेल I आणि येईल ते जाईल I

जे असतचि असेल I तेचि सार II

 

सोहं हंसा तत्वमसि I ते ब्रह्म तू आहेसी I

विचार पाहता स्थिती ऐसी I सहजचि होते II

 

जाणतां जाणतां जाणीव जाते I आपली वृत्ती तद्रूप होते I

आत्मनिवेदन भक्ति ते I ऐसी आहे II

  

देह हा नाशिवंत आहे पण आत्मा अविनाशी आहे म्हणून देहबुद्धी (मी म्हणजे देहच ही बुद्धी) टाळून विचाराने ते अविनाशी तत्व म्हणजेच मी ही सोहम बुद्धी मनुष्यमात्रांनी बाळगली तर ती खरी आत्मनिवेदन भक्ती असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण षष्ठी शके १९४४ , दिनांक १५/१०/२०२२)


No comments:

Post a Comment