Sunday, October 2, 2022

देवाचिये द्वारी - ८५

 


जीवपणाची फ़िटली भ्रांती I वस्तू आली आत्मप्रचिती I

प्राणी पावला उत्तम गती I सदगुरूबोधे II

 

निर्गुणास निर्गुण केले I सार्थकाचे सार्थक जाले I

बहुतां दिवसां भेटले I आपणासि आपण II

 

जाले साधनाचे फ़ळ I निश्चळास केले निश्चळ I

निर्मळाचा गेला मळ I विवेक बळे II

 

एकदा मनुष्य प्राण्याने आपण स्वतः जीव आहोत ही भ्रांती सोडली की त्याला आत्मप्रचिती येऊन त्याला मोक्षरूपी उत्तम गती प्राप्त होण्यास अडथळा येत नाही. मनुष्यप्राण्यांनी स्वतः आत्मारूप आहोत ही भावना बाळगावी असे श्रीसमर्थांचे प्रतिपादन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन शुद्ध सप्तमी शके १९४४ , दिनांक ०२/१०/२०२२)


No comments:

Post a Comment