सावधान आणि चंचळ I चहूंकडे
वळवळ I
येकलाचि चालवी सकळ I इंद्रियेद्वारा
II
आत्मा नसतां देहांतरी I मग
ते प्रेत सचराचरी I
देहसंगे आत्मा करी I सर्व कांही
II
देह अनित्य आत्मा नित्य I हाचि
विवेक नित्यानित्य I
अवघे सूक्ष्माचे कृत्य I जाणती
ज्ञानी II
या देहाचे जे चलनवलन जो आत्मा
आणि हा देह यांचे शाश्वत आणि नश्वरपणाचे नाते श्रीसमर्थांनी अनेकवेळा आपल्यासमोर मांडले
आहे. आपल्या देहाचे चलनवलन असणारा आत्माच सर्वकाही आहे कारण आत्मा नसलेला देह प्रेत
आहे आणि ते त्याज्य आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण पंचमी शके १९४४
, दिनांक १४/१०/२०२२)
Excellently explained.
ReplyDelete