मुख्य हरिकथा निरूपण I दुसरें
ते राजकारण I
तिसरें ते सावधपण I सर्वविषईं
II
चौथा अत्यंत साक्षेप I फ़ेडावे
नाना आक्षेप I
अन्याये थोर अथवा अल्प I क्षमा
करीत जावे II
जाणावे पराचे अंतर I उदासीनता
निरंतर I
नीतिन्यायासि अंतर I पडोच नेदावे
II
प्रत्येक मनुष्याने या जगात वावरताना त्यांना अनेक सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींना सामोरे जावे लागतेच. अशा प्रसंगी किती सावधपणे वागावे आणि वागताना बाह्य प्रवृत्तींचा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ न देता आपली सात्विक प्रवृत्ती राखून कसे वागावे ? याचा आदर्श वस्तूपाठ श्रीसमर्थ आपल्यासमोर मांडताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन कृष्ण तृतीया शके १९४४
, दिनांक १२/१०/२०२२)
No comments:
Post a Comment