निर्गुणी ज्ञान जाले I म्हणोन
सगुण अलक्ष केले I
तरी ते ज्ञाते नागवले I दोहिंकडे
II
नाही भक्ति नाही ज्ञान I मधेंच
पैसावला अभिमान I
म्हणौंनिया जपज्ञान I सांडूंच
नये II
निःकाम भजनाचे फ़ळ आगळे I सामर्थ्य
चढे मर्यादेवेगळे I
तेथे बापुडी फ़ळे I कोणीकडे
II
भक्त भगवंती अनन्य I त्यासी
बुद्धी देतो आपण I
येदर्थी भगदद्वचन I सावध ऐका
II
म्हणौन सगुण भजन I वरी विशेष
ब्रह्मज्ञान I
प्रत्ययाचे समाधान I दुर्लभ
जगीं II
निर्गुणाची साधना जरी श्रेष्ठ
गणल्या गेलेली आहे तरी साधकांनी सगुण उपासनेला सोडू नये असे श्रीसमर्थांना वाटते. सगुण
उपासना करीत असताना मनात त्या परमेश्वराच्या निर्गुण स्वरूपाचे ब्रह्मज्ञान ज्या साधकाकडे
असेल तो दुर्लभ साधक.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध द्वादशी / त्रयोदशी,
शके १९४४ , दिनांक ०७/१०/२०२२)
No comments:
Post a Comment