ऐका प्रचितीची लक्षणे I प्रचित
पाहेल ते शाहाणे I
येर वेडे दैन्यवाणे I प्रचितीविण
II
म्हणौनी अनुमानाचे कार्य I
भल्यांनी कदापि करू नये I
उपाय पाहाता अपाये I नेमस्त
घडे II
तैसे प्रचितीवीण ज्ञान I तेथे
नाही समाधान I
करून बहुतांचा अनुमान I अनहित
जालें II
प्रपंचात काय किंवा परमार्थात
काय एखाद्या गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय त्या गोष्टीवर अनुमानाने विश्वास टाकणे म्हणजे
स्वतःचे अनहित करणे असे श्रीसमर्थांना वाटते. परमार्थात रोकडी प्रचिती आली पाहिजे हा
श्रीतुकोबा आणि श्रीसमर्थांचा सारखाच आग्रह आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध चतुर्दशी शके
१९४४ , दिनांक ०८/१०/२०२२)
No comments:
Post a Comment