विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान I
रामकृष्णी मन नाही ज्याचे II
उपजोनि करंटा नेणे अव्दैतवाटा I
रामकृष्णी पैठा कैसेनि होय II
व्दैताची झाडणी गुरूवीण ज्ञान I
त्या कैचे कीर्तन घडेल नामी II
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान I
नामपाठ मौन प्रपंचाचे II
या अभंगातही अव्दैत सिद्धांताचेच प्रतिपादन माऊलींनी
केलेले आहे. जपजाप्य करताना, नाम घेतानाही त्या आराध्य दैवताचे ध्यान आपल्या मनात नसेल
तर तो जपजाप्य व्यर्थ होईल असे माऊली सुचवताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण पंचमी, शके १९४४ , दिनांक १८/०७/२०२२)
No comments:
Post a Comment