देवाचिये व्दारी उभा क्षण भरी
I
तेणे मुक्ती चारी साधियेल्या
II
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा I
पुण्याची गणना कोण करी II
असोनि संसारी जिव्हे वेगु करी I
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
II
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे I
व्दारिकेचे राणे पांडवाघरी.
II
"देवाचिये व्दारी उभा क्षण भरी" यात देवासमोर क्षणभर उभे राहण्यापेक्षा उभा क्षण (उभे आयुष्य याअर्थी उभा क्षण = प्रत्येक क्षण) जो भरतो त्याला चारही मुक्ती (सारूप्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सालोक्य मुक्ती आणि सायुज्य मुक्ती) काय दूर आहेत ? असा अर्थ अभिप्रेत आहे.
(आषाढी एकादशी, शके १९४४ ,
दिनांक १०/०७/२०२२)
!!जय जय रामकृष्ण हरी!! ... सुंदर !!
ReplyDelete