हरि उच्चारणी अनंत पापराशी I
जातील लयासी क्षणमात्रे II
तृण अग्निमेळे समरस झाले I
तैसे नामे केले जपता हरि II
हरि उच्चारण मंत्र हा अगाध I
पळे भूतबाधा भेणे तेथे II
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ I
न करवे अर्थ उपनिषदां II
नामस्मरणाचे महत्व अधिक अधोरेखित करणारा हा अभंग.
गवताला ज्याप्रमाणे अग्नि लागला की गवत जसे पूर्ण जळून जाते तशी भक्तांची अनेक प्रकारची
पापे केवळ नामस्मरणाच्या सहवासात आल्यानेच नष्ट होतील हे माऊलींचे प्रतिपादन.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण सप्तमी, शके १९४४ , दिनांक २०/०७/२०२२)
No comments:
Post a Comment