समाधी हरीची समसुखेवीण I
न साधेल जाण व्दैतबुद्धी II
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे I
एका केशिराजे सकळ सिद्धि II
ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी I
जव त्या परमानंदी मन नाही II
ज्ञानदेव रम्य रमले समाधान I
हरिचे चिंतन सर्वकाळ II
जोपर्यंत अव्दैताच्या परमानंदात मन बुडून जात नाही
तोपर्यंत "ऋद्धिसिद्धिनिधी अवघीच उपाधी " हे सगळे उपाय मनुष्याच्या मागे
नसत्या उपाधी बनून राहतील हा निखळ स्वच्छ अध्यात्माचा माऊलींचा उपदेश.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक २२/०७/२०२२)
No comments:
Post a Comment