एक नाम हरी द्वैतनाम दूरी I
अद्वैतकुसरी विरळा जाणे II
समबुद्धी घेता समान श्रीहरी I
शमदमांवेरी हरी झाला II
सर्वांघटी राम देहादेही एक I
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी II
ज्ञानदेवा चित्ती परिपाठ नेमा
I
मागिलीया जन्मा मुक्त झालो. II
"सर्वांघटी राम देहादेही एक"
सर्व प्राण्यांमध्ये एकच परमात्मतत्व भरलेले आहे या अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करणारा
हा अभंग. नेमाने हा परिपाठ करणा-या भक्ताची गतजन्मातल्या क्रियमाणांमधून मुक्तता करण्याची
ग्वाहीच माऊली आपल्याला देत आहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण एकादशी , शके १९४४ , दिनांक २४/०७/२०२२)
No comments:
Post a Comment