भावेवीण भक्ती भक्तीवीण मुक्ती
I
बळेवीण शक्ती बोलू नये II
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित
I
उगा राहे निवांत शिणसी वाया
II
सायासे करिसी प्रपंच दिननिशी
I
हरिसी न भजसी कोण्या गुणे
II
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे
I
तुटले धरणे प्रपंचाचे II
प्रपंच करण्यासाठी आपण दिवसरात्र
भरपूर प्रयत्न करीत असतो. तितकेच लक्ष आपण त्या परमात्म्याकडे लावले आणि त्याला भावपूर्ण
पद्धतीने आळविले तर आपला प्रपंचही सुखाचाच होईल.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढी पौर्णिमा, व्यासपौर्णिमा, गुरूपौर्णिमा, शके १९४४ , दिनांक १३/०७/२०२२)
राम कृष्ण हरी
ReplyDeleteराम कृष्ण हरी
ReplyDelete