नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ I
लक्षुमी वल्लभ तयांजवळी II
नारायण हरी नारायण हरी I
भक्ति मुक्ति चारी घरी त्याच्या II
हरीविणे जन्म तो नर्कचि पै जाणा I
यमाचा पाहुणा प्राणी होय II
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड I
गगनाहूनि वाड नाम आहे. II
नामस्मरण हा नित्यनेम करणारे साधक दुर्लभ आहेत. आणि असा नेम करणाऱ्या साधकांसाठी प्रत्यक्ष लक्ष्मी आणि लक्ष्मीपती जवळ उभे राहून त्यांचे सकल मनोरथ पूर्ण करतात असे आश्वासन आपल्याला देऊन आपण सगळ्या साधकांना नामस्मरणाकडे वळण्याचे आवाहन माऊली आपल्याला करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(श्रावण शुद्ध तृतीया, शके १९४४, दिनांक ३१/०७/२०२२)
No comments:
Post a Comment