नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी I
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी II
रामकृष्ण वाचा अनंत राशी तप I
पापाचे कळप पळती पुढे II
हरिहरि हरि मंत्र हा शिवाचा I
म्हणती जे वाचा तया मोक्ष II
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम I
पाविजे उत्तम निजस्थान II
"नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी " असा
हा हरिपाठ ज्याच्या नित्य वाचनात आहे त्याला कलीची आणि काळाची बाधा होणार नाही हे माऊलींचे
हरिपाठाविषयीचे आपण सर्वांना दिलेले आश्वासन आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २३/०७/२०२२)
No comments:
Post a Comment