तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी I
वायाचि उपाधि करिसी जना II
भावबळे आकळे येरवी नाकळे I
करतळी आवळे तैसा हरी II
परिचयाचा रवा घेता भूमीवरी I
यत्न परोपरी साधन तैसे II
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण I
दिधले संपूर्ण माझे हाती II
"भावबळे आकळे येरवी नाकळे " यात परमेश्वराच्या
ख-या स्वरूपाला जाणण्यासाठी केवळ भक्ताच्या मनातला खरा भावच उपयुक्त ठरेल असे माऊलींनी
स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण अष्टमी, शके १९४४ , दिनांक २१/०७/२०२२)
No comments:
Post a Comment