पर्वताप्रमाणे पातक करणे I
वज्रलेप होणे अभक्तांसी II
नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त I
हरीसी न भजत दैवहृत II
अनंत वाचाळ बरळती बरळ I
त्या कैसेनि गोपाळ पावे हरि II
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान I
सर्वाघटी पूर्ण एक नांदे II
अखंड विविध प्रकारची बडबड करणा-या मनुष्याला तो
गोपाळ पावत नाही. ज्या मनुष्याचे दैव हरण झाले आहे त्या मनुष्याला हरीच्या भक्तीची
वासना होत नाही आणि हरीची भक्ती ज्याला नाही त्या अभक्ताला विविध पातके सतत बाधत असतात.
या अभंगात पुन्हा एकदा भक्त आणि परमेश्वराच्या अव्दैत रूपाचे प्रतिपादन केलेले आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढ कृष्ण तृतीया, शके १९४४ , दिनांक १६/०७/२०२२)
No comments:
Post a Comment