त्रिगुण असार निर्गुण हे सार
I
सारासार विचार हरिपाठ II
सगुण निर्गुण गुणांचे अगुण
I
हरीविणे मन व्यर्थ जाय II
अव्यक्त निराकार नाही ज्या
आकार I
जेथूनि चराचर त्यासी भजे
II
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी
I
अनंत जन्मांती पुण्य होय
II
"अव्यक्त निराकार नाही ज्या आकार" या ओळींमध्ये त्या सर्वसाक्षी परमेश्वराच्या निर्गुण निराकार रूपाचे प्रतिपादन केलेले आपल्याला आढळते. या आधीच्या अभंगात आपण परमेश्वराच्या रूपाचे अव्दैत प्रतिपादन केलेले पाहिले या अभंगात निर्गुण रूपाचे गायन माऊलींनी केलेले आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आषाढी शुद्ध त्रयोदशी / चतुर्दशी,
शके १९४४ , दिनांक १२/०७/२०२२)
रामकृष्ण हरी
ReplyDeleteअभिवादन!
ReplyDelete