यापूर्वीचे लेख
आपल्या महाराष्ट्र एस. टी. ने साधारण २०२० च्या सुमारास BS 4 मानकांमध्ये आपल्या बसचा ताफ़ा आणण्याचे ठरवले. या बसेस बांधण्याचे खूप मोठे कंत्राट एम. जी. या कर्नाटकातल्या कंपनीला दिले. त्यांनी लाल + पांढ-या परिवर्तन बसेस, विठाई बसेस आणि काही शयनयान बसेस आपल्या एस. टी. ला पुरवल्या. बदललेल्या मानकांनुसार या बसेसचे प्रवेश आणि निर्गमन द्वार हे चालक केबिन मधून होते.
आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी (पुणे) आणि मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर यांनीही या BS 4 मानकांच्या काही बसेसची बांधणी केली. मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने MH - 14 / HG 82XX ते MH - 14 / HG 84XX पर्यंत काही टाटा गाड्या बांधल्यात पण मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने MH - 31 / FC 3690, MH - 31 / FC 3691 आणि MH - 40 / BL 4081 या तीनच गाड्या बांधल्यात. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हापासून नागपूर ग्रामीण चे आर. टी. ओ. कार्यालय वेगळे सुरू झालेय (MH - 40 पासिंग) तेव्हापासून हिंगणा कार्यशाळेत तयार झालेल्या गाड्या या MH - 31 पासिंगसाठी न येता MH - 40 पासिंग करतात. पण तरीही MH - 31 / FC 3690, MH - 31 / FC 3691 या दोन गाड्या MH - 31 पासिंग कशा काय करवल्यात ? हाच मोठा प्रश्न आहे. MH - 31 सिरीजमधल्या FC पासिंगच्या याच दोन अतिशय दुर्मिळ गाड्या. या दोन्ही गाड्या चंद्रपूर विभागाला दिल्या गेल्यात. तर MH - 40 / BL 4081 ही गाडी यवतमाळ विभागाला दिली गेली.
या फोटोत सगळ्यात दूर असलेली चिमूर डेपोची (चंद्रपूर विभाग) बस म्हणजे MH - 31 / FC 3690, नागपूर जलद राजुरा. ही बस दुर्मिळ आहे.
मध्ये उभी असलेली बस म्हणजे इमामवाडा डेपोची (नागपूर विभाग) MH - 40 / Y 5619, नागपूर जलद भामरागड. ही बस अजूनही एम. एस. बांधणीसाठी गेलेली नाही. अजूनही जुन्या ॲल्युमिनीयम बांधणीतच आहे. या फोटोतली सगळ्यात जवळची बस म्हणजे खुद्द चंद्रपूर डेपोची (अर्थातच चंद्रपूर विभाग) अकोला जलद चंद्रपूर. ही बस MH - 14 / HG 8242. दापोडी कार्यशाळेने विदर्भात ज्या BS 4 गाड्या दिल्यात त्यातल्या सर्वाधिक गाड्या चंद्रपूर विभागाला दिल्यात. या सगळ्या गाड्या MH - 14 / HG 82XX सिरीजमध्ये होत्या. या गाड्या चंद्रपूर डेपोत आल्या आल्या डेपोने त्यांच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या चंद्रपूर - शेगाव आणि चंद्रपूर - नागपूर मार्गावर या गाड्या पाठवल्या होत्या. या गाड्या अजूनही चांगली सेवा प्रदान करत आहेत.
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेल्या फ़क्त तीन गाड्यांमधली MH - 31 / FC सिरीजची एक गाडी या फ़ोटोत. म्हणून दुर्मिळ.
No comments:
Post a Comment