Monday, August 12, 2019

टक्कल आणि फोटोशॉपचे प्रताप

मला स्वतःला केस फार वाढवायला आवडत नाहीत. बाकी जनता जेवढे केस ठेवून सलून बाहेर पडते तेवढे केस ठेवून मी सलूनमधे शिरतो. कापले जावेत म्हणून.
जगातला कदाचित मी एकटाच असेन जो स्वतःला टक्कल पडण्याची आतूरतेने वाट बघत असेल. व. पुं. च्या मते
"१. टक्कल हे नेहमी नीटनेटक असत.
२. त्यात काही स्टाईल नसते आणि
३.टकलाचा मेंटेनन्स नसतो."
नैसर्गिक टक्कल पडेल तेव्हा पडेल पण तोवर "सेमी टक्कल" स्टाईल तरी ठेवूयात म्हणून मी कायम मिल्ट्रीकट पेक्षाही कमी कटिंग ठेवत आलोय.
पण हाय रे किस्मत ! आमचे काही काही मित्र हे माझ्या केसांवर प्रयोग करायला फार इच्छुक असतात असेच आमचे एक मित्र,  Kiran Karthik त्यांनी केलेली ही करामत.


आता एकदम "गुरू — द प्रोफेसर" किंवा "जिंदगी — द लाईफ" सारख्या नावाच्या सौदिंडीयन हिरोसारखा दिसतो की नाही ?

2 comments:

  1. ओरिजिनल फ़ोटो पण द्यायला पाहिजे होता शेजारी.

    ReplyDelete
  2. टकलाला मेंटेनन्स नसतो असे कसे म्हणता आपण..
    यजमानांना टक्कल होते पण तुरळक केस पण होते. ते डाय करावे म्हणून सलून गाठले एकदा त्यांनी. नऊशे रूपये मेलं केस रंगवायचे घेतले. शंभर रंगवण्याचे आणि आठशे शोधण्याचे.

    ReplyDelete