ज्या घरात जुन्या वर्तमानपत्राची रद्दी,
१. अगदी क्रमवार रचून ठेवलेली असते. इतकी की गेल्या रविवारची पुरवणी या रविवारी हवी असेल तर मोजून ८ व्या पेपरमध्ये ती असेलच याची खात्री असेल...
२. रद्दी पेपरची घडी सुध्दा छापखान्यातून बाहेर पडणार्या पेपरच्या घडीसारखी नीट ठेवल्या गेली असेल..
तर
त्या घराला व्यवस्थितपणाच "सिक्स सिग्मा" सर्टिफिकेटच मिळायला पाहिजे. हा माझा आग्रह आहे.
(काहीकाही जण पेपर एकदाच वाचला की इतका चोळामोळा करून ठेवतात की हा पेपर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या काळातला नाही, ह्यावर फक्त तारखेकडे पाहूनच विश्वास ठेवावा लागतो.)
No comments:
Post a Comment