दोनदोन क्रियापदं वापरली (करून राह्यलो, जाऊन राह्यलो वगैरे) की बुलढाण्याच्या पूर्वेला व भंडार्याच्या पश्चिमेला,
"नाष्टा" शब्द कानी पडला की पेठ नाक्याच्या दक्षिणेला
आणि
इंग्रजी क्रियापदाच्या शेवटी "ड" पूर्ण उच्चारला (उदाः confused = कन्फ्यूजड, walked = वाॅकड, सगळे "ड" पूर्ण हं, हलन्त नाही) की शंभर टक्के सोलापूर जिल्हा.
एव्हढा महाराष्ट्राचा भूगोल आमचा पक्का आहे.
— कुठल्याही चॅनेलवरच्या चर्चेत सहभागी माणसांची भाषा नुस्ती ऐकून त्याचा जिल्हा सांगणारे बहुबोलीकोविद कुडमुडे प्राध्यापक रामभाऊ
Amazing observation
ReplyDeleteAmazing observation sir
ReplyDelete