Wednesday, September 2, 2020

"आपण यांना पळवलत का ?"

 हा प्रश्न काळाला विचारावासा वाटणारी परिस्थिती.

२८ वर्षांपूर्वी जगाविषयी खूप वेगळी स्वप्ने बघणारा, स्वप्नाळू, हरहुन्नरी आणि हजरजबाबी तरूण आता जगाच्या रगाड्यात पार हरवलाय. याला एका व्यक्तिमत्वाचा विकास म्हणावे ? की एका तरूणाचे हरवून जाणे म्हणावे ? हा आज मला पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे.



परिपक्व होताना नेहमीच हे जीवन निरागसतेची किंमत चुकवायला लावत का ?
जाऊद्यात. जीवन अनुभवूयात. जीवनाला समजण्याचा वगैरे प्रयत्न नको करायला.
- "जिंदगी को जो समझा
जिंदगी से रोया है."
"Life is what happens to you when you are busy planning something else in your life."
आणि
"येणारा क्षण जातचि असतो,
आहे तो क्षण झेल सुखाने"
या तीनही वचनांवर एकसमयावच्छेदेकरून विश्वास ठेवणारा
आणि तरीही
हरवलेला माझा मीच शोधणारा,
राम किन्हीकर, १९९३ - २०२०.

No comments:

Post a Comment