Friday, September 4, 2020

वैचित्र्य: खाण्यातले आणि खाणा-यांतले

 बालपणी आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी विविक्षित अशा प्रकारच्या खाण्याच्या सवयी असतात.

माझ्या धाकट्या भावाला भातात आमरस कालवून खायला आवडायचे.
आणि सगळ्यात धाकट्याला तर कढीत बेसनाचा / रवा बेसनाचा लाडू कुस्करून ते मिश्रण खायला / प्यायला आवडायचे.
हे सगळे प्रकार मी जवळून अनुभवल्यामुळे त्यामुळेच "आज संध्याकाळी जेवणाचा बेत काय करूयात ?"
या सौभाग्यवतींच्या प्रश्नाला,
"भाकरी आणि सोया मंचुरियन कर"
हे उत्तर एव्हढं चिडण्यालायक नव्हतं याची मला तरी खात्री आहे.
तुमच्याकडे कुणी आहे असं वेगळं combination खाणारं ?
- विचित्र खाण्याचा शौकीन नसलेला, एक साधाभोळा गृहस्थ, रामचंद्रपंतराव

No comments:

Post a Comment