Thursday, September 3, 2020

योजकस्तत्र दुर्लभः

 



या फोटोत दाखवलेला शेल आहे "डबल डेकर" एक्सप्रेसचा. ही वातानुकुलीत डबल डेकर एक्सप्रेसची संकल्पना भारतीय रेल्वेत फारशी यशस्वी ठरली नाही. भोपाळ - इंदूर, मुंबई - मडगाव, बंगळूर - चेन्नई, दिल्ली - जयपूर या सर्व मार्गांवर या गाडीला थंड प्रतिसाद मिळतोय.

त्याला "उदय" (UDAY: Utkrisht Double decker Airconditioned Yatri Express) या नव्या नावाची फोडणी देऊनही ही शिळी संकल्पना प्रवाशांच्या पचनी पडली नाही.
लालूप्रसाद यादवांनी, त्यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या काळात, गरीब रथ ही एक चांगली संकल्पना आणलेली होती. परवडणार्या दरात वातानुकुलीत प्रवास सर्वसामान्य जनतेला भावला होता. एखादा अपवाद वगळता सगळ्याच गरीब रथ गाड्या प्रवाशांमधे सुपर हिट ठरल्या होत्या.
गरीब रथ गाड्यांमधे एका प्रवासी दालनात(bay मधे) मुख्य ३ + ३ बर्थस आणि साईडला पण ३ बर्थस असे ९ बर्थस असायचे. मुख्य बर्थसचा तर तेवढा प्रश्न नाही पण साईडचे ३ बर्थस, त्यांच्या कमी उंचीमुळे, प्रवाशांना अत्यंत गैरसोयीचे ठरत होते.
मला वाटत, गरीब रथ साठी रेल्वेने हा डबल डेकरचा, जरा जास्त उंचीचा आणि वरच्या बर्थलाही खिडकी असलेला, शेल वापरावा. जास्त उंचीमुळे प्रत्येक बर्थला जरा चांगली जागा मिळेल. साईड बर्थसला पण उंचीची अडचण येणार नाही. एकूण बर्थस पण ९ x ९ = ८१ बसतात.
संसाधने भरपूर आहेत. प्रवासी हितासाठी ते वापरणारा "योजकस्तत्र दुर्लभः"
pic courtesy: My railfan friend Mr.
Gaurav Virdi
- कल्पक रेल्वेफॅन राम किन्हीकर

No comments:

Post a Comment