नित्यनेम सांडू नये I अभ्यास बुडो देऊ नये I
परतंत्र होऊ नये I काही केल्या II
थोरपणे असो नये I महत्व धरून बसो नये I
काही मान इच्छू नये I कोठे तरी II
आपण आसक्त होऊ नये I केल्यावीण सांगो नये I
बहुसाल मागो नये I शिष्यवर्गांसी II
निःस्पृहलक्षण नावाच्या या समासात श्रीसमर्थ आपल्यासारख्या प्रापंचिकांना आणि महंतांनाही हा उपदेश करताहेत. आपण रोज ज्या नेमाने कामे, अभ्यास करीत आहोत ती तशीच करीत रहावीत. समाजात वावरताना आपणच एक श्रेष्ठ, आपणच महत्वाचे, मानाचे अशी भावना धरून राहू नये. आसक्तीने न वागता, कृतीशिवाय उपदेश न करता निःस्पृहपणे आचरण करणे श्रेयस्कर असे प्रतिपादन समर्थ करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(श्रावण शुद्ध एकादशी, पुत्रदा एकादशी शके १९४४ , दिनांक ०८/०८/२०२२)
श्री रामदास स्वामींची शिकवण कालातीत आहे. याचा अंगीकार करण्याची शक्ती त्यांनीच द्यावी अशी प्रार्थना🙏
ReplyDelete