Saturday, August 13, 2022

देवाचिये द्वारी - ३५

 


अल्पधने माजो नये I हरीभक्तीस लाजो नये I

मर्यादेवीण चालो नये I पवित्र जनी II

 

हरिकथा सांडू नये I निरूपण तोडू नये I

परमार्थास मोडू नये I प्रपंचबळे II

 

अपकीर्ती ते सांडावी I सदकीर्ती वाढवावी I

विवेके दृढ धरावी I वाट सत्याची II


अगदी थोडेसे धन प्राप्त झाल्यावर माजून जाऊ नये. आपण परमेश्वराची भक्ती करतो हे सांगायला लाजू नये. "प्रपंच करावा नेटका" हा जरी उपदेश श्रीसमर्थांनीच आपल्याला केलाय तरीही पण प्रपंचाच्या नादात परमेश्वराचे आराधन सोडून देऊ नये असाही उपदेश श्रीसमर्थ आपल्याला करताहेत. विवेकाने, विचाराने वागून आपली चांगली कीर्ती जगात झाली पाहिजे या उद्देशाने मनुष्यमात्राने जगात वावरावे असे श्रीसमर्थांना मनापासून वाटते आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण द्वितीया शके १९४४ , दिनांक १३/०८/२०२२)


1 comment:

  1. समर्थांची शिकवण सर्वत्र आणि सदैव उपयोगी आहे.🙏

    ReplyDelete